Thursday, September 15, 2011

वेदांचे अपौरुषेयत्ब

खालील लेख प्रसाद मासिकाच्या सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रसिध्द झाला आहे. त्याची ही छायाप्रत............




Tuesday, September 13, 2011

शक्तिपातसमये विचारणं प्राप्तमीश न करोषि कर्हिचित !
अद्य माँ प्रति किमागतं यतः स्वप्रकाशनविधौ विलम्बसे !!
उत्पलदेव
Ohh Shiva ! you never judge eligibility of your devoter, to make blessing of Shaktipat on him. Irrespective of their Karmas you give them boon. Now what new has happened with me, that you are now delaying it..........

Friday, September 9, 2011

My novel Sargarambh is available on following sites............

http://www.bookganga.com/eBooks/Book/5551514869130598163.htm#

Thursday, July 28, 2011

काशीतील आठवणी-१

वाराणसीला जायच बरेच दिवसा पासुन मनात होते. एकदा गंगास्नान करुन सर्व पापांपासुन मुक्ती मिळाली की झाल. असो गंगास्नान तर झालच पण काशीला फिरण, जुनी जुनी मंदिर पाहण, जुनी पुस्तक पाहण, तत्वज्ञान-धर्म ह्यातील कुणा ताकदीच्या इसमाला भेटण असे बरेच उद्देश होते. पण काही कारणान पुढ पुढ जात राहिल. आणि गेलो तर किमान आठ दिवस तरी राहायच ठरवल होत. ट्रॅव्हल कंपन्यांसारख २ दिवसात स्पॉट उरकण्याच्या वृत्तीचा मला प्रचंड तिटकारा आहे. तुम्हाला त्या शहराच फिल ह्यायला हवा. जो बर्‍यापैकी दिवस तेथे राहिलात तरच येतो. भारतीय लोकांची प्रवास करण्याची मानसिकता उरकण्याची असते. नातेवाईकांना व मित्रांना इम्प्रेस करण्याकरिताच जणू ते प्रवास करत असतात. त्यांना आपण विदेशात जाउन आलो ह्याची प्रौढी मिरवायची असते. ह्याउलट परदेशी प्रवासी जे एकेकटे फिरतात, जिथे आवडेल तिथे मनसोक्त राहतात. ह्यासाठी पुरेसा वेळ काढणे व मूळ भटकण्याची , वेगवेगळ्या गोष्टी पाहाण्याची आवड जोपासणे गरजेचे आहे.सगळ्यात चिड येते ते कळपाने फिरणार्‍या कुटुंबियांची (ग्रुप ट्रॅव्हेलिंग) असो. तर ठरवल साधारण दोन महिने अगोदर की आता जायच वाराणसीच्या यात्रेला.तिकीटांची , राहायची सोय इ. ची पूर्वतयारी झाली . मुक्तपणे फिरायला दोन दोन व आता तीन तीन ही महिने आधी काढावी लागणारी रेल्वे तिकीटे हा एक मोठा अडथळा आहे. उगाचच अतिरिक्त प्लॅनिंग कराव लागत. तात्काळ तिकीटे वगैरे सगळी बोगसगिरी आहे. तर बरेच प्लॅनिंग करुन जून मधल्या एका ढगाळ सकाळी मी वाराणसी रेल्वे स्थानकावर उतरलो. उष्ण वार्‍याचा झोत उतरल्या उतरल्या जाणवला. ह्यासाठीच मी मुद्दामुन लेट जूनमध्ये जायच ठरवल होत. उत्तर भारतातला उन्हाळा चांगलीच परीक्षा बघतो. तिथे असच आपल्या सारख ऊन अंगावर खात फिरता येत नाही. कमी आर्द्रतेमुळे , पडणार ऊन जास्त तीव्र असत त्यामुळे सन स्ट्रोकची शिकार बरेच जण होतात. दिल्लीतील प्रवासाचा पूर्व अनुभव असल्याने वाराणसीला उन्हात शिजायचे नव्हते , त्यामुळे लेट जून बरा काळ होता. पहिला पाऊस येऊन गेल्याने गारवा निर्माण होईल अशी अपेक्षा होती. तेवढा गारवा नव्हता पणा ऊनही नव्हत. उतरल्या उतरल्या जेथे राहायची सोय केली होती त्यांना फोन लावला . काशी महाराष्ट्र भवनचे देव गुरुजी. त्यांनी कस व कुठे ह्यायच सांगितल . स्टेशन वर नेहमीच्या युपी भैय्यांचा ससेमिरा चुकवत बाहेर आलो. इथे सायकल रिक्षा मोठ्याप्रमाणात आहेत. मला पूर्वी त्यांच्यात बसणे मानवते विरुद्द वगैरे वाटायचे. पण मी तिच करायची ठरवल. त्यातुन शहराच दर्शन चांगल होत व फसवले जाण्याची ही शक्यता कमी. त्याप्रमाणेच घडल. विशेष ताप न देता, त्याने मला भैरोबा मंदिरा पाशी आणून सोडल. ह्या भागात आल्या आल्या लक्षात येत होत की हा काशीचा जुना भाग आहे.
मी गुरुजीनी पाठवलेल्या माणसाची वाट पाहात मंदिरापुढील चौकात उभा राहिलो इकडे तिकडे पाहात. अनेक पानांचे ठेले दिसत होते, चहाची ही अनेक दुकाने चालू होती. इथे गॅस वर कोणी चहा करत नाही. तर चूली वर करतात. दाट दुधाचा चूलीवर केलेला वाफाळता व कुल्हड मधून दिलेला चहा हे इथले चहाचे वैशिष्ट्य ! मला पुण्यातल्या अमृततुल्य चहाची आठवण झाली. व गुळम्ट पाणी ओतुन केलेल्या चहाला अमृततुल्य म्हणणार्‍या पुणेकरांची कीव आली. चहाचा एक सीप घेऊन मी पुढे एका ठिकाणी बरीच गर्दी दिसत होती तिचे निरीक्षण करु लागलो. जो माणूस मला घेउन जायला येणार होता तो तरी अजून आला नव्हता. म्हंटल बघाव जाऊन काय ते. म्हणून पुढे जाऊन पाहिल आणि अक्षरशः चाट पडलो. सरकारमान्य भांगेचे दुकान असा बोर्ड असलेली एक टपरी होती. एका छोट्या बोर्ड वर गोळी, पाने, पुडी असे वेगवेगळे दर ही लिहीलेले होते. बरेच उत्साही लोक तिथे खरेदी करीत होते. गांजा भारतात सरकारमान्य केव्हा पासुन झाला ह्याचा विचार करीत होतो तेवढ्यात गुरुजीनी पाठवल्या माणसाने मला हाक मारली. म्हंटल आधी रुम वर जाऊ. काशीतल्या पहिल्याच दिवशी गांजा घेऊन आउट होणे शहाणपणाचे होणार नाही :) जरी सरकारमान्य असला तरी!
त्या माणसा पाठोपाठ मी काशीच्या गल्ल्यातुन चालू लागलो. ह्याच त्या जगप्रसिध्द अरुंद गल्ल्या . गल्ल्या एवढ्या अरुंद व असंख्य फाटे फुटलेल्या आहेत, की पुढील आठ दिवसात मी कधी येथे वाट चुकलो नाही असे झाले नाही. अरुंद गल्ल्यातुनच समोरुन गाई येत जात असतात. त्यांना वाट देत आपल्याला जावे लागते. गाई बरोबर आता बाईक वाले ही त्याच अरुंद जागेतुन आता येतात. एकदम चिकटुन असलेले वाडे व असे अरुंद गल्ली बोळ हे अशा प्राचीन शहरांचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः मुघल आक्रमणा नंतर ही जी शहरे टिकुन राहिली अशा शहरांचे प्राचीन भाग सारखेच आहेत. लखनौ बघा. जुनी दिल्ली बघा. अगदी जुन्या पुण्याचे वर्णन ही असेच आहे. सततच्या आक्रमणाच्या भीतीने व लपायला सोईस्कर व्हावे म्हणून अशी शहरे वसवली जात असावीत. कारण भारतीय शिल्पशास्त्रानुसार वाडे , रस्ते प्रशस्त असले पाहिजेत. असली बोळकांडे एक भयगंड दाखवतात आक्रमकांबद्द्लचा. असो
तर अनेक बोळातुन व चौकातुन फिरत आम्ही गुरुजींच्या वाड्यापाशी पोचलो. वाड्या बाहेर लिहीले होते काशी महाराष्ट्र भवन. गुरुजींनी अस्खलित मराठीत माझे स्वागत केले.
काशीच्या ह्या भागाला प्राचीन खंड म्हणतात. इथे चारशे मराठी लोकांची घरे आहेत. जे पेशव्यांबरोबर व नंतर इथे आले. काशीची मोगलांनी इतक्यांदा नासधूस केली की आता अस्तित्वात असलेली काशी फक्त पेशवे व अहिल्याबाई होळकर ह्यांनी पुन्हा उभारलेली आहे. पेशव्यांनी अनेक वाडे बांधले. जुन्या मंदिरांचा जीर्णोध्दार केला. गंगेवरील सर्व ८० घाट हे अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा उभारलेले आहेत. काशी विश्वेश्वराचे देवालय ही त्यांनीच संपूर्ण नव्याने उभारले. त्यामुळे ह्या प्राचीन खंड भागात घरघुती मराठी वाटत होते. जवळच एका वाड्यात एक गणेश मंडळ होते. ' टिळकांनी इथे १८९४ मध्ये पुण्याबरोबरच गणेशोत्सव सुरु केला जो आजतागायत सुरु आहे'. गुरुजी माहिती सांगत होते. ह्याला म्हणतात जुन्या शहराचा फील. जो एका मॉडर्न लॉज वर राहुन व टूर कंपनी बरोबर फिरुन कधीच मिळाला नसता.
आता सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे गंगादर्शन व स्नान !. मी आवश्यक कपडे ,पळी भांडे इत्यादी घेऊन गंगेवर निघालो. तिथुन दुर्गा घाट जवळच आहे अस मला गुरुजीनी सांगितल. तरी वाटेत एकाला विचाराव लागलच . इथे कोणी गंगेला नदी असा उल्लेख करीत नाही. गंगाजी असा आदरानेच उल्लेख केला जातो. अखेर मी दुर्गा घाटावर पोचलो. पाऊस पडल्याने व वरुन पाणी सोडल्याने , गंगा बरीच वर आली होती. अथांग पात्र समोर दिसत होत. मला माहिती आहे, आजचा ९० समाज वर्ग गंगेतल्या किंवा अशा कुठल्या ही तीर्थक्षेत्रातल्या स्नानाची टिंगलटवाळी करणे पसंद करतो. मग काशी असो वा नाशिक. ह्यांचा एकच प्रश्न प्रदुषित पाण्याने , अस्वच्छ पाण्यात आंघोळ केल्याने शुध्दता कशी होणार ?? आता ह्या बैलांना हे कसे समजणार शुध्दी स्थूल देहाची करायची नसुन ज्या सूक्ष्म देहाला अनंत जन्मांची कर्मे व पापे चिकटली आहेत त्यांची करायची आहे. स्थूल शरीर स्वच्छ करायला उत्तम बॉडी वॉश लावुन शॉवर खाली उभारले की पुरे. गंगेवर कशाला जायच ? . जे शरीरापलीकडे पाहु शकत नाहीत त्यांना घाण शरीर व घाण पाणी हेच दिसणार. ज्यांचा पवित्र प्रवाहावर विश्वास आहे तेच अशा ठिकाणांच्या स्नानाने पवित्र होण्याची थोडी आशा राहते. मी ह्यावर विश्वास ठेवतो व हा विश्वास असाच कायम राहावा अशी अपेक्षा करतो. परलोकात तारणारी श्रध्दाच असते, तर्क करणारी बुध्दी नव्हे. ह्या श्रध्देनेच मी गंगेच्या पवित्र पाण्यात तिसरी बुडी मारली. व त्या रोखलेल्या क्षणभरच्या श्वासाने मला अनंत जन्माचे पुण्य परत मिळवुन दिले.

क्रमशः

Monday, July 18, 2011

Importance of yoga for vedanta students

Request & few words for advaita vedanta students who do not believe on yoga. Adi Shankara had written nice books on yoga. Yoga-Taravali is one of them. Even his Vartika on Patanjal yog sutra is important.. Please listen to this video carefully, study the things to get illegibility to do yoga first. Vedanta is for higher minds. It is for those whose Ritambhara Prajna ie Advanced Intellect has developed or Chitta is cleaned by Grace of Guru & Ishwara. So first believe on Ishwara who created this world , than try to find Guru, then your Chitta will be cleaned. Then only you will be able to understand what is said in Vedanta books by Adi Shankara. In one word it is very very Advanced & Secret to know for normal humans.

So please listen carefully......

Wednesday, May 18, 2011

List of 84 asanas

List of 84 asanas ..just found on Net... Adding here for reference in future


1. Siddhasana
2. Bhadrasana
3. Vajrasana
4. Simhasana
5. Silpasana
6. Four types of Padmasana – i. Bandha Padmasana
7. ii. KaraPadmasana
8. iii. Samputita Padmasana
9. iv. Suddha Padmasana
10. Six types of Mayurasana – i. Danda Mayurasana
11. ii. Parsva Mayurasana
12. iii. Sahaja Mayurasana
13. iv. Bandha Mayurasana
14. v. Pinda Mayurasana
15. vi. Eka Pada Mayurasana
16. Bhaivarasana
17. Kamadahanasana
18. Paripatrasana
19. Karmukasana
20. Svastikasana
21. Gomukhasana
22. Virasana
23. Mandukasana
24. Markatasana
25. Matsyendrasana
26. Parsvamatsyendrasana
27. Baddhamatsyendrasana
28. Niralambanasana
29. Candrasana
30. Kanthavasana
31. Ekapadakasana
32. Phanindrasana
33. Pascimatanasana
34. Sayitapasimatanasana
35. Citrakarani
36. Yoga Nidra
37. Vidhunanasana
38. Padapidanasana
39. Hamsasana
40. Nabhitalasana
41. Akasasana
42. Utpadatalasana
43. Nabhilastapadakasana
44. Vrscikasana
45. Cakrasana
46. Utphalakasana
47. Three types of Kurmasana i. Uttanakurmasana
48. ii. Kurmasana
49. iii. Baddhakurmasana
50. Narjavasana
51. Kabandhasana
52. Goraksasana
53. Angusthasana
54. Mustikasana
55. Bhramaprasaditasana
56. Five Kukkutas such as i. Pancaculi Kukkuta
57. ii. Ekapadakakukkuta
58. iii. Akarita Kukkuta
59. iv. Bhandaculi Kukkuta
60. v. Parsvakukkuta
61. Ardhanarisvarasana
62. Bakasana
63. Dharavahasana
64. Candrakantasana
65. Sudhasarasana
66. Vyaghrasana
67. Rajasana
68. Indraniasana
69. Sarabhasana
70. Ratasana
71. Citrapithasana
72. Baddhapaksi-asana
73. Isvarasana
74. Vicitranalinasana
75. Kantasana
76. Suddhapaksi-asana
77. Sumandraka
78. Caurangi-asana
79. Krauncasana
80. Drdhasana
81. Khagasana
82. Brahmasana
83. Nagapitha
84. Savasana

Chapter 3-Hatha Ratnavali

Tuesday, May 17, 2011

बोगस अध्यात्माची सुरसकथा-१

सदर विषयावर लेखन करायच अनेक दिवसांपासून मनात होत. पण आधीच आध्यात्मिक गुरुंची प्रतिमा चांगली नाही, त्यात मी स्वतः आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे . त्यामुळे हा विषय माझ्यासाठी थोडा नाजूक बनला होता. पण मग जे आपण निष्कर्ष काढले आहेत, विचार केला आहे (तो १००% बरोबर आहे अशी खात्री आहे) तो मांडला पाहिजे अस मला वाटल.
मी इथे काही मुद्दे वार निष्कर्ष मांडणार आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल. लेखामध्ये स्पष्टीकरणाच्या ओघात विषय भरकटण्याची शक्यता असते.
हे निष्कर्ष सांगण्यापूर्वी मला एवढेच सांगायचे आहे, समस्त आध्यात्मिक साधकांना किंवा जिज्ञासुंना, मी विस्तृत वाचन , विचार, अनुभव आणि परीक्षण ह्या नंतर हे निष्कर्ष काढले आहेत.
मी अजुन ही पूर्ण आध्यात्मिक आहे, पारंपारिक वैदिक विचारांचा पुरस्कर्ता आहे, व सश्रध्द आस्तिक आहे. समस्या कुठे आहे हे आपल्याला खालील मुद्दे वाचुन कळेल.
एक सूचना- नास्तिक बुध्दिवाद्यांनी आपल्या बाजुने हा काही पुरावा मानु नये. जे सश्रध्द आस्तिक आहेत , त्यांच्या साठीच हा विषय आहे.
१. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. शिष्याने गुरु कडे जावे हा प्राचीन आदेश मोडून गुरुच समुद्र उल्लंघायची बंदी मोडून परदेशात जाऊ लागले व शिष्य शोधू लागले. असे करताना त्यांना सर्व नियम-यम मोडावे लागले , व पाश्चात्य शिष्यांनुसार उपदेशात बदल करावा लागला.
२.चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता. आधुनिक गुरुनी प्रसिध्दी साठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अ‍ॅड्जस्ट केला, व ते ही बोलू लागले, लोकांनो स्वर्ग-नरक जे काही आहे ते ह्या पृथ्वीवरच आहे, ह्या जीवनातच अनुभवायचे आहे. पारंपारिक अध्यात्म स्वर्ग-नरकांचे मरणोत्तर अस्तित्व सांगत होते.
३.चमत्कार हा पारंपारिक सिध्दत्वाची निषाणी होती. चमत्कार तेथे नमस्कार हा साधा नियम होता. ज्यांच्या जवळ कुठले ही सामर्थ्य नव्हते, अशा गुरुंनी सांगायला सुरुवात केली , चमत्कार म्हणजे हातचलाखी, ते दुय्यम दर्जाचे ! .................. विचार बघा...उच्च मानसिक अनुभव घ्या...समाधि अनुभवा. सर्व पारंपारिक संतांजवळ, योग्यांजवळ असामान्य दैवी सामर्थ्य होते, सिध्दी होत्या. त्याची विस्तृत वर्णने सगळ्या जुन्या चरित्रात उपलब्ध होती. नव्या गुरुंकडे सिध्दींचा अभाव असल्यामुळे , त्यांनी केवळ मानसिक अनुभवांवर भर द्यायला सुरुवात केली
४. अजुन थोडा काळ गेला, आता समाधी अनुभवायला देणे ही नव्या गुरुंना जमेना, मग त्यांनी ध्येय अजुन खाली आणले. मानसिक शांती, रिलॅक्सनेस, चिन्तामुक्ती , आरोग्य ही नवीन ध्येये बनली
५. शिष्याला १००% अनुभव देऊन जन्म-मरण चक्रातुन सोडवणे ही भारतीय अध्यात्माची परंपरा. नव्या गुरुंनी अनुभवाची जबाबदारी शिष्यांच्या वरच ढकलायला सुरुवात केली. सर्व प्राचीन व ऐतिहासिक गुरुंनी शिष्याची संपूर्ण जबाबदारी स्वता:वर घेतल्याचे त्यांच्या चरित्रातुन दिसते. नवे सामर्थ्यहीन गुरु नेमके उलटे करु लागले, कारण त्यांना स्वतःलाच आपल्या आध्यात्मिक उन्नती बाबत खात्री नव्हती.
६.१९४० च्या सुमारास अशांचा उदय झाला की ज्यांनी तत्वज्ञानाच्या नावाखाली मूर्तिभंजन सुरु केले. सर्व अनुभवांना विरोध करुन, शब्दच्छ्ल सुरु केला. स्थितीहीन स्थिती, कालातीत जगणे, वर्तमानात जगणे, हे सोपे असल्याचे लोकांना भासवुन उच्च बौध्दिक वर्तुळात महान तत्वज्ञ म्हणून मिरवायला सुरु केले. अनाकलनीयता व पाखंडीपणा ह्यामुळे विदेशात लोकप्रिय होण्यास ह्यांना फार वेळ लागला नाही.
७.१९८० च्या दशकात काही असे नवे संत जन्मले, जे वेदान्ताच्या नावाखाली बेधडक सांगु लागले, पुनर्जन्म वगैरे काही अस्तित्वात नाही, जे काही आहे आता इथेच . मृत्युनंतर आपण सगळेच सत्यामध्ये परत जाऊ व जन्मापूर्वी ही आपण सत्यच होतो. काही तर तुम्ही ह्या क्षणाला मुक्तच आहात, साधनेची वगैरे कोणती ही गरज नाही इ. बेलगाम असत्य प्रतिपादन करु लागले . असले पाप कृत्य करताना व बरोबर संतत्व मिरवताना त्यांना काही वाटले नाही.
८.ह्या सर्व नव्या गुरुंमध्ये एक समानता होती, अलौकिकतेला , चमत्कारांना ह्यांचा विरोध होता. कारण ह्यांच्या स्वतःजवळ ते सामर्थ्य नव्हते. सर्व सामान्य लोकांची दु:खे दुर केल्याच्या कोणत्या ही घटना ह्यांच्या चरित्रात दिसत नाहीत. सिध्दीहीन, सामर्थ्यहीन असे हे बोलबच्चन गुरु भारतीय महान योग्यांच्या परंपरेला कलंक बनुन राहिले. योगसामर्थ्य नसणे हे ह्या सर्वांचे कॉमन लक्षण होते.

१८९३ मध्ये सुरु झालेली ही परंपरा आजता गायत टिकुन आहे. अगदी १०००० कोटींची मालमत्ता ही बनवुन आहे. सर्वदुर देशात ह्यांचे आश्रम आहेत. फिलॉसोफर म्हणून ह्यातील काही जगप्रसिध्द आहेत, ह्यांचे ग्रंथ जगभर वाचले जातात. जे वाचुन अनेक लोक तात्पुरती मनःशांति मिळवतात. पण ते यु कॅन विन सारख्या उत्तेजक पुस्तकांसारखे असते. शिष्याला भवसागराच्या पार नेण्याचे अद्वितीय सामर्थ्य त्यांच्या जवळ नसते. भारतीय योग व अध्यात्म परंपरेला सगळ्यात ठेच कुणी पोचवली असेल तर ह्यांनी स्वतःच ! गेल्या साधारण शंभर वर्षात उत्पन्न झालेल्या ह्या मॉडर्न गुरुंनी !!!!!!!!!!!!!!!!!

प्रामाणिक आध्यात्मिक वाचन करणार्‍यांना वरील निष्कर्षात तथ्य वाटेल अशीआशा आहे....................
ता.क.- नावे मुद्दामुनच घेतलेली नाहीत, कारण लिस्ट मोठी होईल, व त्यातुन मुद्दा हरवेल.

Tuesday, April 12, 2011

प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे.
१. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी
२.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते
३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची
४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची
५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची
६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची
७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची.
८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप
९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल.
हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे)
ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे.
समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः /
द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः //

भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता /
भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा //

याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी /
पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता //

उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता /
तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः /

{लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे}
(लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल.
मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल.
लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व
सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम
यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम
रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे)

लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे.

ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन

संदर्भ-
सूर्यसिध्दान्त
विष्णु पुराण
सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य

Wednesday, April 6, 2011

उपेक्षित इतिहाससंशोधकाची मुलाखत

......... तर गेल्या वेळी मी आमच्या इतिहास संशोधन पध्दतीचा परिचय करुन दिला होता. अर्थात त्याला वैचारिक दिशाभूल पध्दती म्हणणे योग्य होईल. ह्या वेळी थोडा दुसरा प्रसंग सांगणार आहे. मागच्या वेळी फक्त मनुवाद्यांच्या वाड्यात जावे लागले होते, ह्यावेळी प्रत्यक्ष एका प्रतिगामी इतिहास संशोधकाची भेट घ्यायची होती. खर तर आम्ही ह्याला इतिहास संशोधक अस म्हणत ही नाही, मिथकवादी, पुनरुज्जीवन वादी असे काही बाहि शब्द आम्ही वापरतो. अशा माणसाच्या घराची पायरी चढायची हि माझी इच्छा नव्हती..पण काय करणार? आमच्या लाल विद्यापीठातून आदेश आला, की भगवी ब्रिगेड इतिहासामध्ये नवीन काय अपप्रचार करणार आहे त्याचा आढावा घ्या.. म्हणे त्यांच्या राज्यातील अभ्यासक्रमात ते हा इतिहास लागू करणार आहेत. काही ही, पण तोपर्यंत आमच्या सिब्बलांनी एनसिआरटी चा अभ्यासक्रम राज्यांच्या गळ्यात मारलाच. बघा अगदी थोड्याच दिवसात महाराष्टातील बहुतेक शाळातुन (ज्या आता इंग्रजी माध्यमाच्या आहेत) शिवछत्रपतिंच्या इतिहासाऐवजी, मोगलांचा इतिहास शिकवायला सुरुवात होईल. मराठ्यांच्या इतिहासाला कोपर्‍यात ढकल्यण्यात आले असेल....
असो..विषयांतराची खोड काही जात नाही. मी त्या इतिहास संशोधकाच्या घरी गेलो. घर तसे जुनेच होते, हा मनुष्य साधारण ८० ला टेकला असेल(आमच्या लाल टोळी विरोधात लढायची चांगली हिम्मत आहे ह्या वयात). साधारण परिचय झाल्या नंतर मी मुलाखत सुरु केली.
आपल्याला विचारवंत संशोधकाचा दर्जा देत नाहीत ह्या बाबत खंत वाटते का ?
जे स्वतः राजकीय प्रचारक आहेत त्यांनी दुसरा संशोधक आहे का नाही हे ठरवणे हा विनोद होईल. अज्ञाताचा शोध घेणे हे संशोधकाचे काम आहे. हे धार्मिक आहे, हे पौराणिक आहे म्हणून झिडकारणे बुध्दिमंताचे लक्षण नव्हे.
आपल्याला अनेकांनी पौराणिक कथाकार म्हणून हिणवले आहे ?
का... मी पौराणिक संदर्भ वापरले म्हणून ? पाश्चात्यांचा इतिहास इ.स. पू ४००० पासुन सुरु होतो म्हणून आपलाही तेव्हाच व्हायला पाहिजे असा थोडाच नियम आहे. पुराणे हा इतिहासच आहे, फक्त हजारो व लाखो वर्षांचा ! उत्क्रांतिवाद व आधुनिक विज्ञानवाद्यांच्या अपप्रचाराला भुलुन आपण आपला विश्वास का सोडायचा? पुराणात हजारो वर्षांच्या राजांच्या वंशावळी आहेत, त्यांनी केलेल्या महान युध्दांच्या कहाण्या आहेत . निव्वळ चमत्कार आहेत म्हणून पुराणे नाकारणे मला पटत नाही . हा निव्वळ मतलबीपणा आहे. चमत्कार आजच्या विज्ञानाच्या सामर्थ्याबाहेर आहेत म्हणून पूर्वी ही ते नव्हते म्हणणे हा ढोंगी पणा आहे.
पुराणातील गोष्टींना पुरातत्वीय पुरावे मिळत नाही त्याचे काय??
शोधले तर मिळतात. पण ज्यांना राजकीय सोईसाठी शोधायचेच नाहीयेय त्यांना कसे मिळणार ? द्वारके बद्द्ल मिळाले नाहीत ? सरस्वती नदी सापडली नाही ? अयोध्येत मिळाले नाहीत ? ... एक लक्षात घ्या जिथे आपली प्राचीन शहरे होती तिथेच नवी शहरे ही आहेत. दिल्ली, काशी,अयोध्या,मथुरा हजारो वर्षांपासुन त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे तिथे उत्खनन अशक्य आहे...ट्रॉय सापडले कारण ते कधीच जमीनदोस्त झाले होते, रोमच्या पम्पाचे ही तसेच . शिवाय आपल्या इथे मोठ्या नद्या आहेत ज्यांना दर वर्षी महापूर येतात. अशा परिस्थित अवशेष मिळण्याची शकयता कमी होते. महाभारताचे युध्द झाले तो तर अत्यंत सुपीक प्रदेश आहे. इथे असंख्य मातीचे थर साचले असतील. फुटक्या मडक्यांपेक्षा , आपल्याकडे तयार इतिहास आहे त्याच अभ्यास करा ना !!
पण सगळे संशोधक पक्षपाती आहेत असा आपला दावा का ? अगदी पाश्चात्य ही?
पाश्चात्य संशोधकांचा हेतुच मूळात इथल्या संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचा होता. शिवाय त्यांचे हिंदु धर्माचे आकलन कमी असल्यामुळे ही त्यांचे बरेच गैरसमज झाले. तुम्हाला दिसेल , एकाच काळात एवढे ब्रिटीश, जर्मन प्राच्यविद्या संशोधक का झाले ? त्यांचा ब्रिटिश शासनाला भारतीयांना समजण्यात व त्यांना अपेक्षित सामाजिक बदल करण्यात उपयोग होत होता म्हणून ! सध्या बघा..... ओक्सफर्ड मध्ये संस्कृत विषय निधी अभावी बंद करण्यात आला आहे. इतर विद्यापीठे ही त्याच मार्गावर आहेत. जर्मनीतील एका विद्यापीठात गेले १५० हुन अधिक वर्षे संस्कृत शिकवले जात होते ते आता बंद होईल. कारण सोपे आहे , त्यांचा उद्देश संपला आहे. भारत कधीच अँग्लो-इंडियन बनला आहे.
आपण विशिष्ट राजकीय प्रणालीशी निगडीत आहात हा आपल्यावर आरोप आहे?
ज्यांना पुराणे,वेद,रामायण, महाभारत ह्या शब्दांची अ‍ॅलर्जी आहे ते असा आरोप करतात. ताजमहाल विषयी इतक्या जणांनी पुस्तके लिहीली. कधी शासनाला वाटले संशोधन करावे म्हणून की शहाजानने खरच ताजमहाल बांधला का ह्याचे ! उलट शासन तिथे नमाजाला परवानगी देउन त्यावर विशिष्ट समाजाचा दावा मान्य करते. पुरातत्वीय विभागाच्या हातात इतकी वर्षे ताजमहाल राहिला आहे , की मंदिराच्या बाजुच्या पुराव्यांची त्यांनी केव्हाच वासलात लावली असेल. अशी २०,००० मंदिरे आहेत. एका मंदिरासाठी ६० वर्षे केस चालते. ह्यावर काय बोलणार.........
पण इतिहास शास्त्राची एक शिस्त असतेच ना ???
शास्त्र म्हणून तुम्ही स्वतःच्या विचारसरणीला सोईस्कर नियम बनवणार. व आम्हाला अशास्त्रीय म्हणणार. पौराणिक निकष जाउ द्या, अ‍ॅस्ट्रोनोमिचे निकष तरी मान्य करा. जे तुम्ही मेक्सिकन, इजिप्शियन इतिहासाच्यासाठी मान्य करता, पण वेदांचा , महाभारताचा काळ ठरवताना मात्र नाकरता हा पक्षपात नव्हे काय ? आधी काल्पनिक थेअरी बनवायच्या व त्या थेअरींना अंतिम सत्य समजुन सगळा इतिहासच त्यावर रचायच्या. उदा: आर्यांचे आक्रमण, आर्य-द्रविड संघर्ष ! ह्यांचा दुसरा आवडता सिध्दान्त म्हणजे पुराणांमध्ये कायम नवीन भर पडत आली हा ! भांडारकर संशोधन संस्थेने महाभारताची संशोधित आवृत्ती प्रसिध्द केली. काही प्रतीत भाग मुद्दामुन कापला असण्याची किंवा लुप्त झाला असण्याची ही शक्यता होती. सगळ्यात कमी मजकुर असलेली प्रत अधिक प्राचीन हा काय निकष झाला ??? कृष्णाच्या अवतारत्वाविषयी अनेकांना आकस असल्याने, त्याचा अवतार कल्पित ठरवुन हा ह्या संशोधकांनी गुप्त कालखंडातील भर ठरवली. नास्तिकतेने मने ग्रस्त झाल्याने दुसरी अपेक्षाच नव्हती.
.................मी अधिक काळ थांबू शकलो नाही. हे सर्व प्रताप मला पूर्ण विदित असल्यामुळे, थोडिशी का होईना मलाच लाज वाटली (अजुन घरी गणपती बसवत असल्याचा ही हा परिणाम असावा),,,,,,,व त्या पुनरुज्जीवन वाद्याच्या घरातुन मी लगेचच सटकलो............

मुलाखत जरी काल्पनिक असली तरी आशय खरा आहे...

काही संदर्भ
हिन्दु टेम्पल्स-व्हाट ह्यपन्ड टू देम ?------------राम स्वरुप

Tuesday, March 29, 2011

प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक

ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो. अनेकदा प्रमाण म्हणजे बहुतेकांना प्रत्यक्ष प्रमाणच अपेक्षित असते. व त्यातून वितंडवाद निर्माण होत राहतो, ह्यासाठी थोडे प्रत्यक्ष प्रमाणाचे विवेचन अयोग्य ठरणार नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक प्रमाणे वेगवेगळ्या संप्रदायांनी मानलेली आहेत. तरी त्यातील प्रमुख तीन म्हणजे , प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. ह्यातील फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच चार्वाकवादी कवटाळून बसलेले असतात. व तर्कदुष्टता करत असतात. त्याचे कारण आपण पाहणार आहोत.
सर्व आधुनिक विज्ञान हे ’अनुमान’ ह्या प्रमाणावर प्रामुख्याने आधारित आहे. कारण गणितीय सिध्दांत हा ह्या विज्ञानाचा बेस आहे. गणित अनुमानाशिवाय दुसरे काही नसते. अणुच्या घटकांचा शोध अनुमानानेच लागत गेला. प्रत्यक्ष एलेक्ट्रोन,प्रोटोन कोणाला दिसत नव्हते. डार्विनची अख्खी थेअरी जनुकीय समानते वरुन केलेले अनुमान नाही तर दुसरे काय ? इथे ही मास्यांचे , पक्षांचे अनुकुलन होतांना कोणी ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. बिग बन्ग थेअरी, कृष्णविवरांचा सिध्दांत ही खगोलीय अनुमाने आहेत. नारळीकरांना कृष्णविवर इंद्रियांना अनुभवायला आले असे घडलेले नाही. तेथे ते अनुमानाचाच आधार घेतात तरी ज्योतिषाला विरोध करतान मात्र ग्रहांचा परिणाम मनुष्यावर कसा होतो हे मला प्रत्यक्ष दाखवा म्हणून हट्ट धरतात. हे निव्वळ काही वैज्ञानिकच नाही तर प्रत्येक चार्वाकवादी (पुरोगामी/अंधश्रध्दा विरोधक) असाच दुराग्रह धरत असतो. ह्यामागील खरी गोम काय आहे ते आपण बघू.
ईश्वराने जगत निर्माण केले हे एक हेत्वाभास नसलेले अनुमान आहे. जसे प्रकाश हा किरणांच्या स्वरुपात आहे का द्र्व्याच्या स्वरुपात आहे हे जसे अनुमान आहे तसे. किंवा अणुच्या केंद्रका भोवती एलेक्ट्रोन फिरतो हे जसे अनुमान आहे. एलेक्ट्रोन्च्या निर्मितीचे किंवा त्याहून ही सूक्ष्म असलेल्या सब-एटोमिक पार्टिकल्सचे कारण सांगता येत नाही म्हणून एलेक्ट्रोनचे अस्तित्व कोणी नाकारत नाही. तसेच ईश्वराच्या जगत निर्मितीच्या अनुमानाबद्दल ही आहे. असा सरळ तर्क न स्वीकारता. बिग बन्ग, अमिनो असिड, इ. कल्पना चार्वाकवाद्यांना स्वीकाराव्याशा वाटतात. अंतिम कारण असणारे अनुमान श्रेष्ठ का चक्राकार फिरणारे अनुमान योग्य ह्याचे उत्तर निरनिराळ्या तत्ववेत्यांनी दिले आहे. हे सर्व वेगवेगळ्या संस्कृतीतले आहेत. वैदिक नाहीत. कांट,आरिस्टोटल,प्लॆटो,डेकार्ट हे वैदिक नाहीत. आधुनिक चार्वाकवादी ह्यांपेक्षा स्वत:ला बुध्दिमान समजत असतील तर त्यांची दुर्बुध्दी त्यांना लखलाभ असो. ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना ईश्वर नकोसा होतो. हे कारण छुपे असते. ह्यांना नीतिनियम नको असतात , आपली बुध्दि अहंकाराने ग्रस्त आहे हे त्यांना मान्य नसते, मृत्यूच्या अनामिक भीतिने ते सतत पछाडलेले असतात , कदाचित नरक असेल तर आपल्याला तिथे असह्य छळ सोसावा लागेल ह्याची त्यांच्या अंतर्मनामध्ये भीती असते(पूर्वजन्मीच्या नरकभोगाची ही आठवण ही असू शकते). अशा सगळ्या न्यूनगंडातून ते आम्हाला ईश्वर दाखवा, स्वर्ग दाखवा, आत्मा दाखवा असे प्रश्न करू लागतात. साधे ज्योतिषाचेच पहा. कुणी ही ज्योतिषी हे मान्य करेल की ज्योतिष हे ग्रहांचि स्थिति व त्याचे मानवांवर होणाऱ्या परिणाम ह्यातील अनुमानांवर आधारित आहे. ग्रहांचे कोणते ही किरण नाहीत जे मानवावर पडून परिणाम करतात. चाओस थेअरी ज्यांना परिचित असेल ते जाणतील की विश्वातील प्रत्येक छोट्या घटनेचा अनेक मोठ्या घटनांशी संबंध असतो. ह्या दृष्य अनुमानाच्या आधारेच भविष्या सांगितले जाते. त्यासाठी मग , पत्रिका, हात, संख्याशास्त्र,पत्ते इ. वापरले जातात. दृश्य अनुमान व भविष्याच्या सिध्दतेचा त्याला मिळणारा आधार ह्यावर ज्योतिष शास्त्र आधारित आहे. हे समजुन न घेता ग्रह लाखो किमी दूर आहेत, ते मनुष्यावर परिणाम कसा करतील , परिणाम होताना आम्हाला का दिसत नाही असे अनेक कुतर्क करत राहतात. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होतो हे निर्विवाद अनेकांनी सिध्द करून ही ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते.कारण एकच धर्माविषयी आकस !
चार्वाकवाद्यांचे सतत एकच टुमणे असते. आम्हाला पाहायला द्या. एखाद्या प्रतिबंधित प्रयोगशाळेत जायला ही पात्रतेची आवश्यकता असते. कुणीही वेडगळ उठून तिथे जाउ शकत नाही. व मला प्रत्यक्ष दाखवाच म्हणू शकत नाही. तसेच स्वर्ग पाहाण्यासाठी ही काही पात्रतेची आवश्यकता आहे, योगातल्या सिध्दी मिळवण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. पण पात्रता न मिळवता मला दाखवाच म्हणणारे , अणुभट्टीत शिरुन मला माझ्या शरिरावर किरणोत्सर्ग दाखवा म्हणणाऱ्या पेक्षा जास्त शहाणे नसतात. कर्मसिध्दान्त, ईश्वर, आत्मा, परलोक, ह्या भक्कम अनुमानाने सिध्द केलेल्या गोष्टी आहेत. चार्वाकवाद्यांची तर्काने ह्यांचे खंडंन करण्याची कुवत नसते(ह्यांचे सर्व तर्क हेत्वाभासस्वरुप असतात). मग ते मला प्रत्यक्ष दाखवाची रट लावतात. ज्योतिषांना ज्योतिष सिध्द करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:च्या सवंगड्यांबरोबर कृष्णविवरांची यात्रा करुन , बिग बन्ग थेअरीला प्रत्यक्ष करावे व नंतर येऊन ज्योतिषाच्या सिध्दतेच्या गोष्टी बोलाव्यात.
साधे सूक्ष्मजीव पाहायला जर सूक्ष्मदर्शक लागतो, तर पारलौकिक गोष्टी पाहायला असाच पारलौकिक दर्शक लागेल हे ह्यांना समजू नये काय ? पण विज्ञाननिष्टेच्या नावाखाली सोयीस्करपणा करणाऱ्यांना कोण समजाउ शकेल ? ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने त्यांनी आधी समजून घ्यावीत व मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे. पण हे करण्यासाठी त्यांना चार्वाकवाद सोडावा लागेल त्याचे काय ?

भारतीय इतिहासातील युगपुरुषांचे खरे काळ

भारतीय इतिहासातील युगपुरुषांचे खरे काळ ............

महाभारत युध्द इ.स.पू ३१३८
श्रीकृष्ण स्वधामगमन
अर्थात कलियुगारंभ इ.स.पू ३१०२
आर्यभट्ट पहिला इ.स.पू २७६५
गौतम बुद्ध जन्म इ.स.पू १८८७
चन्द्र्गुप्त मौर्य व चाणक्य इ.स.पू १५३४
अशोक मौर्य इ.स.पू १४८२
पतंजलि इ.स.पू १२१८
आदि शंकराचार्य इ.स.पू ५०९
श्री हर्ष विक्रमादित्य** इ.स पू ४५७
चन्द्र्गुप्त-गुप्त वंशीय * इ.स.पू ३२७
विक्रमादित्य इ.स.पू ६६
शालिवाहन इ.स. ७८

वरील काळ हे हिन्दू परंपरेनुसार आहेत...व अनेक प्रामाणिक(तटस्थ) इतिहास संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार आहेत...
* हा अलेक्झांडरच्या समकालीन होता....
** अल्बेरुनीने उल्लेखलेला हाच तो शक कर्ता हर्ष

Friday, March 25, 2011

भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा

थंडीचे दिवस होते.. तुम्हाला माहिती आहेच पुण्यातील थंडी कशी बोचरी असते ते...पण आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा ह्यापेक्षा ही अधिक बोचरा आहे... माझे प्रेरणास्थान व महान इतिहाससंशोधक व विचारवंत एम.आर.गुप्ता पुणेभेटीला आले होते. मी एम.ए. केल्यापासून मी त्यांचे विचार वाचत आहे...अगदी शास्त्रीय लेखन , भारताच्या इतिहासालेखनाला त्यांनी आपल्या नवीन दृष्टीने वेगळीच कलाटणी दिली... अर्थात तशी कलाटणी गेल्या शंभर वर्षापासूनच मिळाली आहे म्हणा..मॅक्सम्युल्लरने जे एकदा नियम ठरवले...ते आजतागायत अबाधित आहेत..(टिळक त्याला मोक्षमुल्लर म्हणत असत. बिचारे टिळक..ते ही त्यांच्या प्रभावाखाली आले...व त्यांनी आर्य़ांना उत्तर ध्रुवावर नेऊन ठेवले) हा मॅक्सम्युल्लर खरा आपला माणूस...त्याने डास कॅपिटल वाचले असेल काय???? असो विषयांतर झाले .. मी माझ्या प्रेरणास्थानाविषयी बोलत होतो.. गुप्तांचे नवीन संशोधन असे की त्यांनी वेदातील काही भाग गुप्त कालखंडात(इ.स. सातवे-आठवे शतक) रचला गेल्याचे सिध्द केले... हे फारच कठीण होते... पुराणात.. महाभारतात घालघुसड झाली हे सिध्द झालेच होते ..पण ह्यां बुर्झ्वांच्या प्रिय वेदात ही सरमिसळ??? ह्या महान संशोधनाबद्दल गुप्तांचा नावलौकिक जगभर झाला... जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने तर त्यांचा खास गौरव केला..(अर्थात हा आमचाच प्राचीन अड्डा आहे म्हणा) ..तर असा महान संशोधक पुण्यात आला होता...
डेक्कन कॉलेजात त्यांचे काम होते...पुण्यात त्यांचे व्याख्यान मी आयोजीत केले होते... हा मोठा सुवर्णक्षण होता.. पुणे तसे मार्क्सवादापासून प्रत्यक्ष लांब होते..पण वैचारिक क्षेत्रात मात्र इथे आमचा हात कोणी धरणार नाही... जिथे देशातील सगळी विद्यापीठे जिथे आमच्या विचारांच्या प्रभावाखाली आहेत...तिथे पुणे काय? इथे तर संशोधनाची सुरुवातच भांडारकरांसारख्यानी केली.. ज्यांचा बुर्झ्वांना तीव्र विरोध होता... मध्येच एक राजवाडेनामक भट उपटला व काही ही प्रलाप करु लागला... पण आम्ही अशी उपेक्षा केली...की आता त्यांच्या इतिहास संशोधन मंदिरात कोणी फिरकत ही नाही...आमच्याकडे एक कसब निर्विवाद आहे... कुणी कितीही पुरावे आणले तरी त्यांना बुर्झ्वाम्हणले की काम झाले.. इथे भारतात आम्ही त्यांना मनुवादी..प्रतिगामी.. पुनरुज्जीवनवादी अशी शेलकी विशेषणे वापरतो... विद्यापीठे ..वर्तमानपर्त्रे...प्रकाशनसंस्था आमच्या ताब्यात आहेत... ह्यांनी ढिगभर पुरावे आणले तरी ते खोटे आहेत म्हंटले की काम झाले... पुण्यातील काही द्वाड संशोधकानी वेदाचा काळ ५ ते ७ हजार वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न केला..पण त्यांना शास्त्रीय मान्यताच मिळू शकली नाही.. इ.स. पूर्व १५०० ही तर मॅक्सम्युल्लर ची मर्यादा.. आम्ही अश्मयुग..ताम्रयुग..लोहयुग..अशी एकाहून एक पाचर मारुन ठेवली आहे(डार्विनच्या नसलेल्या आत्म्याला शांति लाभो)... की जरा कोणी भारतातील इतिहास थोडा मागे नेऊ लागला की लगेच..म्हणायचे...तेव्हातर लोहयुग होते...तेव्हातर लेखनकलाच नव्हती.. अस बरच काही.. आणि पुराणातील पुरावे तर मान्यच करायचे नाहीत..ते तर मनुवाद्यांचे काल्पनिक ग्रंथ !.. एकदा वेदांचा काळ जवळचा केला आणि हे मनुवादी भारतात बाहेरुन आले हे दैवी (आम्ही त्याला निसर्गनियम म्हणतो) सत्य बनवले की... सारे संशोधनच सोपे झाले... मग हे प्रतिगामी कितीही ओरडोत... त्यांचे संशोधन शास्त्रीय होऊच शकणार नाही... महाभारत..रामायण काल्पनिक आहे हे तर पूर्वीच सिध्द झाले आहे ..त्यामुळे उरते काय? ज्या राजांचे नाव दगडावर लिहून ठेवले नाही..ते अस्तित्वातच नव्हते हे मान्य केले की संपले... ह्यांचे एकापेक्षा एक राजे असे आम्ही खाऊन टाकले... विक्रमादित्य, शालिवाहन ह्यांना इतिहासातूनच हद्दपार केले... पण ह्यांनी सुरु केलेले शक गेले दोन हजार वर्षे कसे चालू आहेत हे एकटा कार्ल मार्क्सच जाणू शकेल... आम्ही चन्द्रगुप्ताला ही असच हद्दपार करणार होतो.. पण तो शिंचा मॅगेस्थेनिस... तरी आम्ही एक करामत केलीच.. अलेक्झांडर ला मौर्य चन्द्रगुप्ताच्या समकालीन बनवले ..(जो वास्तविक गुप्त कुलातील चन्द्रगुप्ताच्या समकालीन होता.) हे करुन आम्ही ह्यांच्या इतिहासात तेराशे वर्षांची पाचर मारुन ठेवली आहे.. ह्यांच्या तेरा पिढ्यागेल्या तरी हे ती पाचर काढू शकणार नाहीत..... अरेरे पुन्हा विषयांतर झाले...
तर मी सांगत होतो.. गुप्तांविषयी ज्यांनी वेदांचा काही भाग इ.स. ७ व्या शतकात आणून ठेवला... व्याख्यानापूर्वी मी त्यांना शनिवारवाडा बघायला घेऊन गेलो...मनुवाद्यांचा अड्डा बघायला त्यांचा प्रथम विरोधच होता..पण.. मीच त्यांना सांगितले..की पेशव्यांच्या इतिहासासंबंधी तुम्ही काही नवीन दृष्टी देऊ शकता का बघा... मग ते तयार झाले... आम्ही वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो... बाजीरावाच्या पुतळ्याकडे बघून त्यांनी एक सुस्कारा टाकला...
" इथे आत मध्ये उत्खनन केले तर काही अश्मयुगीन खापरे सापडतील काय?" त्यांनी विचारल..
" माहीत नाही... पण पेशव्यांच्या घरातील काही भांडी कुंडी सापडू शकतील...अशाने कोकणातून आलेल्या ह्या मनुवाद्यांना आदिवासी असंस्कृत ठरवता येईल काय?" मी विचारले..
" अंहं... त्यांना आदिवासी ठरवायच नाहीय .. तर त्यांचा उद्देश ..सातारा व कोल्हापूरची गादी बळकाउन भटशाही आणण्याचा होता हे सिध्द करायच आहे..."
" पण काशी अयोध्या मुक्त करण्यासंबंधी असलेल्या पेशव्यांच्या पत्रांचे काय? नाना फडणीस, शिंदे, माधवराव, बाजीराव ह्यांची अशी पत्रे आहेत ..?"
" कसली पत्रे ?? हे मनुवादी जर पुराणेच्या पुराणे थापा लिहू शकतात.. तर पत्रे बखरी बोगस आहेत हे सिध्द करणे काय अवघड ? आणि तुम्ही त्या नानाचे कसले नाव घेता... तो तर बाहेरख्याली .... तुम्ही तेंडुलकर वाचलेले दिसत नाहीत...?"
मी थोडा ओशाळलो... तेंडुलकर तर महाराष्टातील आमचे खरे पाईक...ज्याला घाशीराम आवडत नाही तो खरा पुरोगामी नाही असा आमचा एक उघड नियम आहे...
" अहो पण लोकांना अजुन ही पानिपत,स्वामी वाचायला आवडते..."
" वाचूदेत...एकदा आपले संशोधन झाले... की खास आपल्या लेखकाकडून पेशवे विरुध्द भोसले अशी एक हजार पानी फक्कड कादंबरी लिहून घेऊ.. बाय द वे .. तुम्ही नेमाडेंचे लेटेस्ट पुस्तक वाचले असेलच ..?" त्यांनी विचारले...
" नाही अजुन त्यात काय.. आपली नेहमीचीच मार्क्सवादी भंकसगिरी " मी उत्तरलो...
त्यांनी थोड माझ्याकडे आश्चर्याने पाहिल... व आम्ही कोकणी मनुवाद्यांच्या प्राचीन अड्ड्यात प्रवेश केला....................

Saturday, March 19, 2011

उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते . ह्या दोन शतकातील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर डार्विनचा उत्क्रांतिवाद ! अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय ? आपण पाहू ही अन्धश्रध्दा कशी ठरते ते . सर्वसामान्याना ह्याचा परिचय माकडापासून माणूस झाला ह्या वाक्याने असतो . ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे " जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे . कसा ते आता पाहू .
अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष उत्क्रान्तिवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे . प्रकृतिच्या (नेचरच्या) संकटातून वाचणारे कोण ? तर जे सक्षम आहेत . आणि सक्षम कोण आहेत तर जे प्रकृतिच्या (नैसर्गिक) संकटातून वाचले आहेत . ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना कोण सक्षम आहेत हे सांगतात ना कोण नक्की वाचले आहेत हे सांगतात . अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे.आता ह्यातील उपसिध्दान्त म्हणजे , सुरुवातीला जलचर व वृक्ष होते, नंतर ते जमिनीवर आले . मासा पक्षी बनला हा त्याच सिध्दान्ताचा निष्कर्ष . कारण काय ? तर प्राकृतिक संकटामुळे त्याने स्वत:मध्ये अनुकुलन केले व उडण्यासाठी पंख व श्वासांसाठी नाक विकसित केले. हे कधी केले तर कोट्यवधी वर्षांपूर्वी . तेव्हा झाले ना मग आता का होत नाही ? पाण्यातुन बाहेर काढलेला मासा पक्षी बनत नाही तर मृत्यु पावतो . ह्याला उत्तर काय ? तर असे अनुकुलन होण्याची प्रक्रिया कोट्यावधी वर्षांची आहे. ह्याचाच अर्थ हे अनुकुलन कसे होते हे कुणीच शास्त्रज्ञ प्रयोगाने सिध्द करू शकणार नाही .
आता ह्यांच्याच म्हणण्यानुसार शार्क , मगरी , झुरळ इ. सर्वात प्राचीन प्राणी आहेत . मग ह्या जाति उत्क्रान्त न होता , तशाच का टिकून आहेत ? उत्तर नाही. आता ह्या पैकी काही मगरी, शार्क ह्यांचींच उत्क्रान्ति कशी झाली ? सांगता येत नाही . ंमासा व पक्षी ह्यांच्यामधील प्राणी का अस्तित्त्वात नाही ? उत्तर नाही . जी एक दोन जीवाश्मे ह्या मधल्या प्राण्याबाबत दाखवली जातात ती संशयास्पद आहेत . निर्विवाद नाहीत (जीवशास्त्रज्ञाना विचारा)
हाच प्रकार माकडाच्या एका जातिपासुन माणूस बनला ह्या मध्ये आहे. मधल्या जातिच अस्तित्वात नाहीत. एकूण विचार करता ह्याला शास्त्रीय सिध्दान्त म्हणणे हा विनोद होइल. लाखो-कोटि वर्षांची प्रक्रिया दाखवली की प्रयोग व पुरावा दोन्हीची आवश्यकता समाप्त होते . सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनिर्मिति आणि उत्क्रान्तिची मुख्य कारणे योगायोग आहेत . पृथ्वीवरच पाणी का निर्माण झाले ? कारण सुर्यापासुनचे विशिष्ट अंतर . अमिनो असिड मधले नायट्रोजन संयुग कशामुळे ? तर योगायोग. एकपेशीय बहुपेशीय कसे बनले ? संरंक्षणासाठी. पण हा सरंक्षणाचा विचार मेंदु नसताना कसा आला? उत्तर नाही .. एकुण एक सर्व प्रक्रिया ठराविक क्रमाने घडणाऱ्या योगायोगांवर अवलंबून आहे . हे काय विज्ञान झाले ?? ...............आता तुम्ही म्हणाल हे जर एवढे तर्कदुषित आहे, तर ही थेअरी एवढी प्रसिध्द का ?????????? त्याचे कारण दिसणारी समानता !!
मासे व पक्षी , चिंपांझी व माणूस ह्यांच्या गुणसूत्रांत समानता दिसते ह्याचा अर्थ असा नव्हे की एक दुसऱ्यापासून बनला . कुठला ही सबळ पुरावा व तर्कशास्त्रीय आधार नसताना वैज्ञानिकांना ह्या समानतेच्या आधारावर उत्क्रांतिच्या सिध्दांतावर पोचावे असे का वाटले ? कारण त्यांना विश्वनिर्मितीचा दुसरा प्राचीन सिध्दान्त लवकरात लवकर निकालात काढायचा होता .त्यासाठी मग हिमयुग , अश्मयुग , डायनोसोर युग इ. मिथ्या कल्पना बनवण्यात आला. त्याना मिथ्या अशासाठी म्हणत आहे कारण त्यांना कोणताही तर्कशास्त्रीय आधार नाही व प्रत्यक्षजन्य पुरावा नाही.
डायनोसोर युगासंबंधी थोड इथे सांगितल पाहिजे . ह्या विचित्र प्राण्याचे संपूर्ण सांगाडे कुठेही सापडलेले नाहीत . मोठी हाडे व हाडांची रचना सापडलेली आहे जी दुसऱ्या अज्ञात प्राण्यांची ही असु शकते . कल्पनेने वैज्ञानिकांनी हा प्राचीन प्राणी कसा असेल ह्या विषय़ी अंदाज बांधले आहेत. हा प्राणी कसा नष्ट झाला , कोणा कडेच सबळ थेअरी नाही. उल्कापाताने नष्ट झाला वगैरे कल्पना आहेत. निसर्गात नेहमी समतोल दिसुन येतो . डायनोसोर सारखा असंतुलित प्राणि जर पृथ्वीवर असता तर इथले सारे जीवनच धोक्यात आले असते . साहजिकच माणूस त्यावेळी उत्क्रांत झाला नसता . हेच नेमके ह्या वैज्ञानिकाना व तत्ववेत्यांना हवे होते. डायनोसोर ची थेअरी मांडली की आपोआप उत्क्रांतिवादाला आधार मिळतो व समाजाच्या मनातील विश्वनिर्मितिच्या अन्य श्रध्दा सहज हद्द्पार करता येतात.
जलचर, उभयचर, वृक्ष, माकडे , माणसे , कीटक, पक्षी ह्यांच्यातील जनुकीय समानते वरुन एक दुसऱ्यापासून उत्पन्न झाला अशा निष्कर्षापेक्षा , हे सर्व एकाचवेळी उत्पन्न झाले असा सिध्दान्त फार पूर्वी पासून मानव समाजाने श्रध्देने धरुन ठेवला आहे. हा समाज म्हण्जे पृथ्वीवरील धार्मिक लोकांचा समाज होय. धार्मिकलोक हे उपयोजित विज्ञानाबरोबर तर्कशास्त्र व तत्वज्ञान ह्यांचाही विचार करायचे . आजचे वैज्ञानिक निव्वळ उपयोजित विज्ञानावर विसंबून तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे दोघांचे निष्कर्ष वेगवेगळे येतात . आपण उदाहरण घेऊन समाजावुन घेऊ.
अणु हा जड आहे हे सर्वांना मान्य आहे. अनेक अणु एकत्र येऊन त्यांच्यापासुन प्रथम अमिनो असिड व नंतर एकपेशीय जीव निर्माण होण्याचे कारण काय ? आधुनिक विज्ञान सांगते योगायोग !!! आता योगायोग व्हायला काही कारण ? दुसरा योगायोग जे चुकीचे उत्तर ठरेल . कारण त्याने अनवस्था हा तर्कदोष निर्माण होतो. अनवस्था म्हणजे कधीही न संपणारी कारणपरंपरा . अनएन्डिग लूप . त्यामुळे हा सिध्दान्त चुकीचा ठरतो.
तर्कशास्त्रात कारणे दोन प्रकारची असतात . उपादान आणि निमित्त ! उपादान कारण म्हणजे, कारण स्वत:च कार्यात रूपांतरित होणे . उदा. दुधाचे दही बनणे. निमित्त कारण म्हणजे , जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये. अणु किंवा डीनए हे जर उपादान कारण असतील तर, रुपांतरणानंतर उत्क्रांति थांबली पाहिजे .पण वैज्ञानिकांच्यामते उत्क्रांति अजुनही सुरुच आहे . त्यामुळे अणु हे विश्वनिर्मितिचे उपादान कारण होऊ शकत नाही. मग साहजिकच विश्वनिर्मितेचे कारण निमित्त व तटस्थ असले पाहीजे. हे निमित्त कारण वैज्ञानिक कधी ही मान्य करत नाहीत . कारण ह्या तर्काने त्यांच्या काल्पनिक उत्क्रान्तिवादाचे खण्डन होते व हा तर्क सरळ सरळ ईश्वराकडे घेऊन जातो .

Thursday, January 13, 2011

इंटरनेट वर डाउनलोडेबल स्वरुपात असणाऱ्या संस्कृत व प्राच्यविद्येवरील ग्रंथांच्या लिंक्स ....


http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html

http://sanskritdocuments.org/scannedbooks/SanskritIISc.html

http://www.sanskrit.nic.in/ebook.htm

http://sanskritdocuments.org/scannedbooks/asiallpdfs.html

http://is1.mum.edu/vedicreserve/index.htm

वरील साइट्स वर अनेक दुर्मिळ ग्रन्थ उपलब्ध आहेत..

काळ्या खोल दऱ्या ......

काळ्या खोल दऱ्या जिथे प्रेम नाही

नरकवास याहून भला कथिला कुणीही ?

परमार्थज्ञानफल हेच जर विधिलिखित

व्यर्थ भुसा कुटणे स्वयं ब्रह्मा वदित !!१!!



वाचे यदा मी अनेकभक्तचरित्रे

प्रेमाविना न दुसरे दिसलें तयातें

ह्रदि आर्तताच आवडे ईश्वराला

त्याहून अन्य पूजा न मागे स्वतःला !!२!!



वेदान्तग्रन्थ पठतो नित्य सावित्री जपतो

परंतु सदा मी केवळ घसा श्रमवितो

आत्मा ह्या द्विशब्दासह न ऊठे प्रेम जरि ही

होणार कसे ध्यान, कथे स्वतः वेदान्तधी ही !!३!!



समर्थ बोलले महाप्रेम करूणाष्टकांत

नेत्री न ये रे तुजवीण निद्रा म्हणून

अशी भावना कवे होईल माझी ?

आत्मदर्शनास्तव झोप जाईल माझी? !!४!!



रामकृष्ण ही वदले वचनामृतांत

स्वतःसाठी केवढे रडतो विचार मनास !

वाहेल का अश्रूधार बघण्या ईश्वरास ?

ही द्विरामवचने मी पुसतो स्वतःस !!५!!

Tuesday, January 4, 2011

पुढचे लेख

प्राचीन युग कालगणना

भारताच्या इतिहासातील महापुरुषांचे खरे काळ ......

आपले पूर्वज विमाने ऊडवत होते का ?

पाऱ्याच्या प्राचीन गूढ करामती...

Monday, January 3, 2011

पृथ्वी त्रिकोणी आहे काय ??

व्यावहारिक ज्ञान व विज्ञान हे गृहीतकांवर आधारित असते . अपेक्षित उद्देश व उपयोजन साधले जात असेल , तर गृहीतके वेगळी असली तरी चालू शकते. जसे आयुर्वेदातिल त्रिगुणांचे गृहीतक, आधुनिक वैद्यकापेक्षा निराळे आहे पण रोगपरिहार हे दोन्हींचे समान फल आहे .तसेच सूर्याभोवती पृथ्वी फिरते मानणे व पृथ्वी भोवती सूर्य फिरतो असे मानणे , यापैकी काहीही मानले तरी कालमापनात फरक पडत नाही. गृहीतके कालानुसार व संस्कृतीनुसार बदलत राहतात, पण तेवढ्याने परंपरेचा उच्छेद करणे व पूर्वजांची निंदा करणे योग्य ठरत नाही. आपण या लेखात अशाच एका गृहीतकाचा, पृथ्वीचा विचार करणार आहोत.

शब्दांचा जो अर्थ आपण घेतो तोच अर्थ प्राचीन घेत नव्हते. पृथ्वी हा भूलोकाला समानार्थी शब्द आहे. सप्त उर्ध्व लोकांपैकी सर्वात खालचा लोक भूलोक आहे. त्यालाच पृथ्वी असे पुराणात म्हंटले आहे . पृथ्वी शब्दाचा राजा पृथुशी संबंध आहे. पूर्वी कृतयुगात त्याने पृथ्वीचे दोहन केले म्हणून त्याला पृथु नाव मिळाले.

वैदिक शास्त्राने प्रत्येक वस्तु देवता कल्पिलेली आहे. ब्रह्म सर्वव्यापक आहे व तेच एकमेव चेतन आहे हा सिद्धान्त त्यामागे आहे . सर्व जगत एकाच ईश्वराच्या चेतन विभूति असल्याने, प्रत्येक जड वस्तुमागे ही चेतनत्व आहे. हे चेतनत्वच देवता आहे. सूर्य , चन्द्र, गुरु इ. ग्रह जड रुपाने आकाशात फिरतात.पण त्यांचीही चेतन रुपे आहेत, त्यांनाच देवता म्हणतात. फलज्योतिषशास्त्र ह्या संकल्पनेवरच अवलंबुन आहे.नुस्त्या जड भ्रमण करणाऱ्या आकाशातिल ग्रहांचा पृथ्वीवरील मानवांवर काहीही प्रभाव पडत नाही. उदा: सात अश्वांचा रथ ओढणारी तेजस्वी देहमय सूर्य देवता आहे. देवगुरु बृहस्पती हे गुरु ग्रहाचे देवतारुप आहे. अशाच प्रकारे दुर्ग,नगर,संवत्सर,युगे,मुहुर्त,दिशा,नक्षत्र,वेद यांच्याही देवता आहेत. त्या त्या देवता प्रसन्न झाल्यावर त्यांच्या मूर्त स्वरुपाचे संपूर्ण द्न्यान करुन देतात.सूर्य भुवनांचे द्न्यान करुन देतो. पूर्वी मयासुराने व वराहमिहीराने असेच ज्योतिष द्न्यान प्राप्त केले आहे. कुठल्याही वस्तूचे द्न्यान त्यावस्तुने स्वतःच करुन दिल्याशिवाय पूर्णरुपाने होणार नाही. आजच्या शास्त्रद्न्यांप्रमाणे अनंत काल पर्यंत कल्पना लढवत बसणे हा व्यर्थ मार्ग आहे.

अशाच प्रकारे पृथ्वीचे देवतारुप गाय आहे. गाय ज्याप्रमाणे दूध देऊन पोषण करते, त्याप्रमाणेच पृथ्वी अन्न देऊन पोषण करते. मनुष्याच्या जन्माला वीर्य कारणीभूत आहे व वीर्य अन्नापासून बनते. अन्न पृथ्वीपासून येते, त्यामुळे सर्व प्राणिमात्रंच्या जन्माला व्यापक अर्थाने पृथ्वी कारणीभूत आहे. पृथ्वी त्यामुळेच सर्वांची माता ठरते. गाय हे पृथ्वीचे देवतारुप असल्याने, गाय ही सर्वांची माता ठरते. सावरकरांनी म्हण्टल्याप्रमाणे ती केवल, बैलांची माता ठरत नाही. ती सर्व मनुष्य ,देवता आदि सर्वांची माता ठरते. म्हणूनच वैदिक धर्माने गाईला पूजनीय केले आहे. हे झाले पृथ्वीचे देवतारुप ! पृथ्वीचे मूर्तरुप ही योगबलानुसार भिन्न भिन्न दिसते. सामान्य जीवांना ती चेंडू सारखी गोल प्रतीत होते, तर असामान्य योगबल असणाऱ्याना त्रिकोणाकृती दिसुन येते. सामान्य दृष्टीने ती आकाशात तरंगत आहे, तर योगज दृष्टीने ती सप्त द्वीपे व सप्त सागर ह्यांनी युक्त असुन भगवान शेषांनी आपल्या फणेवर धारण केली आहे. हे समजण्यासाठी आपण थोडा प्राचीन वैदिक भूगोल बघू, हा बराच रहस्यमय आहे.

पृथ्वी सात द्वीपानीयुक्त असुन सर्वात केन्द्र स्थानी जम्वू द्वीप आहे. खाली दाखवल्याप्रमाणे जम्बुद्वीपा भोवती लवणसागर व त्या भोवती इतर सहा द्वीप व सहा सागर आहेत.

सप्तद्वीप सप्तसागर
जम्बु लवण
प्लक्ष इक्षुरस
शाल्मल मदिरा
कुश घृत
क्रौञ्च दधि
शाक दुग्ध
पुष्कर गोड पाणि

ह्यापैकी जम्बुद्वीप म्हणजे सध्या सामान्य दृष्टीने अनुभवायला येणारी पृथ्वी. तिच्या भोवती लवण सागर आहे. अर्थात खाऱ्यापाण्याचा समुद्र आहे. इतर चवींचे समुद्र ह्या भासमान पृथ्वीवर कुठेही नाहीत. त्यामुळे अनेक अभ्यासकांनी पुराणातील भूगोल ह्या पृथ्वीवर शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याना यश मिळाले नाही. ह्या जम्बुद्वीपातील फक्त भूगोल ह्या दृश्य पृथ्वीवर सापडू शकतो. जम्बूद्वीपात नऊ वर्षे आहेत.[विशिष्ट संस्कृती असलेल्या भूभागाला संस्कृत मध्ये वर्ष म्हणतात] इलावृत्त, भारत,किम्पुरुष,हरि, रम्यक ,हिरण्यमय , उत्तरकुरु , भद्राश्व आणि केतुमाल. ह्यापैकी भारतवर्ष म्हणजे प्रस्तुत सिन्धुपासुन कन्याकुमारि पर्यंत असलेला भारत देश. इतर वर्षे इतर देशांच्या रुपाने आजही विद्यमान आहेत. तिथे पूर्वी निरनिराळ्या रुपात वैदिक उपासनाच चालत असे. आता मात्र तिथे म्लेंच्छ धर्म फोफावला आहे. तरी देखील प्राचीन ग्रन्थावरुन व त्यांच्या इतिहासावरुन त्या वर्षाचे आजचे स्थान कळू शकते. उत्तर कुरु म्हणजे दक्षिण अमेरिका, केतुमाल वर्ष म्हणजे आफ्रिका , भद्राश्ववर्ष म्हणजे जपान-कोरिया, किम्पुरुषवर्ष म्हणजे इंडोनेशीया,कम्बोडिया आदि .आग्नेय देश. ह्या वरती अधिक संशोधन आवश्यक आहे. तर अशी सप्तद्वीपात्मक पृथ्वी भगवान शेषांनी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. शेष , पृथ्वी आणि त्रिकोणाकृती ह्यांचा परस्पर काय संबध आहे ते आत बघू.

भूमितीशास्त्राप्रमाणे रेषा म्हणजे अनंत त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचा भाग! तद्वतच सरळ पृष्ठभाग म्हणजे अनंत त्रिज्या असलेल्या घनगोलाचा मर्यादित पृष्ठभाग ! त्यामुळे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे इन्टिग्रेशन करुन घनगोलाच्या पृष्ठभागाचे एकन्दर क्षेत्रफल काढता येते. भौतिकशास्त्रातला दुसरा नियम असा की नैसर्गिक बनणारा पदार्थ असा आकार घेतो की पदार्थाचे क्षेत्रफळ हे त्याच्या असलेल्या घनफळाच्या कमीत कमी रहावे जेणे करुन कमीत कमी उर्जा ख्रर्च होईल . उदा: पावसाचा थेंब गोल आकाराचाच बनतो. यानुसार ठराविक घनफलाच्या वस्तुचा कमीत कमी ऊर्जा खर्च करुन बनलेला आकार म्हणजे घनगोल होय.ह्या प्राथमिक माहिती नंतर आपण गुरुत्वाकर्षणाकडे येऊ. गुरुत्वाकर्षण हे त्रिमितिय जगाच्या रचनेला कारणीभूत आहे. गुरुत्वाकर्षण नसेल तर हे जग द्विमितिय बनेल. गुरुत्वाकर्षण समजा नष्ट झाले तर वर पाहिलेल्या भौतिक शास्त्राच्या नियमानुसार कमीत कमी ऊर्जा खर्च करुन बनलेला द्विमितिय पृष्ठभाग म्हणजे त्रिकोण होय. ऊर्जेची जास्तीत जास्त बचत हा निसर्गनियम असल्यामुळे , द्विमितिय जगात नैसर्गिक पृष्ठभाग हा त्रिकोण असेल. ह्याच प्रमाणे आपल्याला अनुभवायला येणाऱ्या त्रिमितिय जगात पृथ्वी, चंद्र , सूर्य हे सर्व घनगोलाकार आहेत. प्रत्येकामध्ये गुरुत्वाकर्षणऊर्जा आहे, ह्या ऊर्जेनेच त्यांना त्रिमितिय बनवले आहे. आता जर गुरुत्वाकर्षण जर दूर केले तर हे सर्व ग्रह त्रिकोणाकृती बनतील. हा सिध्दांत समजणे फार महत्वाचे आहे.

जीवाच्या सूक्ष्म (लिंग) देहात सात चक्रे कल्पिलेली आहेत त्या चक्रांची सुरुवात गुद व लिंग ह्यांच्या मधील शिवणीच्या स्थानापासुन होते. ते मूलाधारचक्राचे स्थान आहे. तिथपासुन मस्तकापर्यन्त सात चक्रे कल्पिलेली आहेत, जी प्राणाच्या साहाय्याने योगामध्ये भेदली जातात. अपान हा प्राण ह्या मूलाधार चक्राशी संबंधीत आहे. त्याची दिशा खालची आहे व तो देह पृथ्वीवर उभा राहण्यास कारणीभूत असतो. माकड हाड हे त्याचे स्थान आहे. अपानामुळे देह गुरुत्वाकर्षणाला विरोध करुन उभा राहू शकतो. जे योगी अपानावर विजय मिळवतात , ते आकाशात ऊडु शकतात. योगशास्त्रानुसार मूलाधारचक्राशी संबंधीत तत्व पृथ्वी आहे. त्याचा गूढ आकार समभुज त्रिकोण आहे, व हया त्रिकोणाखाली कुण्डलिनी शक्ति निवास करते. हे झाले व्यष्टिनिरुपण ! याच धर्तीवर समष्टिस्वरुपात भूगोल हा पहिला लोक आहे, समष्टी अपानविरहित त्याचा आकार त्रिकोणकृती आहे व हा लोक भगवान शेषाच्या फणेवर आहे. सामान्य दृष्टी दूर करुन योगज दृष्टीने पाहिल्यास वरील विवेचन समजुन घेता येईल.

भारतीय प्राचीन ज्योतिषांनीही पृथ्वी घनगोल व आकाशात तरंगती मानली आहे. पण हे सामान्य स्वरुप आहे. जे सामन्यांना ज्ञेय आहे. गाय हे पृथ्वीचे देवतास्वरुप आहे जे उपासनेस योग्य आहे. त्रिकोणाकृती सप्त द्वीपात्मक व सप्त सागरात्म्क पृथ्वी अर्थात भूलोक जो शेषाच्या मस्तकावर आहे ते पृथ्वीचे योगज स्वरूप आहे. ज्योतिषीय पृथ्वी ही वस्तुतः जम्बुद्वीप आहे असे ही म्हणता येऊ शकेल. श्री भागवतात जम्बु द्वीपाचा आकार खालील प्रमाणे सांगितला आहे.

यो वायं द्वीपः कुवलयकमलकोशाभ्यन्तरकोशो नियुतयोजनविशालः समवर्तुलः यथा पुष्करपत्रं !५! [भागवत ५-१६]

अर्थ:- भूलोकरुप कमल कोषाच्या आत जी सात द्वीपे आहेत त्यापैकी सगळ्यात आत जो कोष म्हणजे जम्बु द्वीप होय. त्याचा विस्तार एक लक्ष योजन आहे व ते कमलपत्राप्रमाणे समगोल आहे.

पृथ्वीची घनगोल , त्रिकोणाकृती आणि गो-माता ही तिन्ही स्वरुपे त्या दृष्टीने योग्य आहेत. श्री गुलाबराव महाराज ह्या संबंधात काय म्हणतात ते पाहु व ह्या लघुलेखाचा शेवट करु.

कटिस्थानी असे धरणी ! कंदस्थानी कुण्डलिनी !

ती जेवी का सहस्त्रफणी ! तेवीच असे !!

म्हणोनी शेषावरी धरणी ! ऐसे बोलिले पुरांणी !!

व्यष्टि पृथ्वीचा शेष कुण्डलिनी ! समस्त पृथ्वीचा सहस्त्रफणी !! [य़ोगरहस्य ]

References:-
Surya Siddhanta-Chapter-7
Vishnu Purana
shri Bhagwat..

सूर्यसिद्धन्तानुसार(भूगोलाध्याय)पृथ्वीचे गोलत्व आणि तत्कालीन महत्वाची शहरे

समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः /
द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः //

भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता /
भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा //

याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी /
पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता //

उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता /
तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः /

{लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे}
{ (लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल.}


खालील श्लोकावरुन कळून येईल की प्राचीन वैदिक ज्योतिषांना पृथ्वीच्या जड स्वरूपाचे अचूक ज्ञान होते. तिचे चेतनस्वरूप मात्र त्यांनी गूढ त्रिकोणात्मक सांगितले आहे.

अन्ये अपि समसूत्रस्था मन्यन्ते अधः परस्परम् /
भद्राश्वकेतुमालस्था लङ्कासिद्धपुराश्रिताः //

सर्वत्रैव महीगोले स्वस्थानम् उपरि स्थितम् /
मन्यन्ते खे यतो गोलस् तस्य क्वोर्धवम् क्व वाधः //

अल्पकायतया लोकाः स्वस्थानात् सर्वतो मुखम् /
पश्यन्ति वृत्ताम् अप्य् एताम् चक्राकाराम् वसुन्धराम् //