सदर विषयावर लेखन करायच अनेक दिवसांपासून मनात होत. पण आधीच आध्यात्मिक गुरुंची प्रतिमा चांगली नाही, त्यात मी स्वतः आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे . त्यामुळे हा विषय माझ्यासाठी थोडा नाजूक बनला होता. पण मग जे आपण निष्कर्ष काढले आहेत, विचार केला आहे (तो १००% बरोबर आहे अशी खात्री आहे) तो मांडला पाहिजे अस मला वाटल.
मी इथे काही मुद्दे वार निष्कर्ष मांडणार आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल. लेखामध्ये स्पष्टीकरणाच्या ओघात विषय भरकटण्याची शक्यता असते.
हे निष्कर्ष सांगण्यापूर्वी मला एवढेच सांगायचे आहे, समस्त आध्यात्मिक साधकांना किंवा जिज्ञासुंना, मी विस्तृत वाचन , विचार, अनुभव आणि परीक्षण ह्या नंतर हे निष्कर्ष काढले आहेत.
मी अजुन ही पूर्ण आध्यात्मिक आहे, पारंपारिक वैदिक विचारांचा पुरस्कर्ता आहे, व सश्रध्द आस्तिक आहे. समस्या कुठे आहे हे आपल्याला खालील मुद्दे वाचुन कळेल.
एक सूचना- नास्तिक बुध्दिवाद्यांनी आपल्या बाजुने हा काही पुरावा मानु नये. जे सश्रध्द आस्तिक आहेत , त्यांच्या साठीच हा विषय आहे.
१. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. शिष्याने गुरु कडे जावे हा प्राचीन आदेश मोडून गुरुच समुद्र उल्लंघायची बंदी मोडून परदेशात जाऊ लागले व शिष्य शोधू लागले. असे करताना त्यांना सर्व नियम-यम मोडावे लागले , व पाश्चात्य शिष्यांनुसार उपदेशात बदल करावा लागला.
२.चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता. आधुनिक गुरुनी प्रसिध्दी साठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अॅड्जस्ट केला, व ते ही बोलू लागले, लोकांनो स्वर्ग-नरक जे काही आहे ते ह्या पृथ्वीवरच आहे, ह्या जीवनातच अनुभवायचे आहे. पारंपारिक अध्यात्म स्वर्ग-नरकांचे मरणोत्तर अस्तित्व सांगत होते.
३.चमत्कार हा पारंपारिक सिध्दत्वाची निषाणी होती. चमत्कार तेथे नमस्कार हा साधा नियम होता. ज्यांच्या जवळ कुठले ही सामर्थ्य नव्हते, अशा गुरुंनी सांगायला सुरुवात केली , चमत्कार म्हणजे हातचलाखी, ते दुय्यम दर्जाचे ! .................. विचार बघा...उच्च मानसिक अनुभव घ्या...समाधि अनुभवा. सर्व पारंपारिक संतांजवळ, योग्यांजवळ असामान्य दैवी सामर्थ्य होते, सिध्दी होत्या. त्याची विस्तृत वर्णने सगळ्या जुन्या चरित्रात उपलब्ध होती. नव्या गुरुंकडे सिध्दींचा अभाव असल्यामुळे , त्यांनी केवळ मानसिक अनुभवांवर भर द्यायला सुरुवात केली
४. अजुन थोडा काळ गेला, आता समाधी अनुभवायला देणे ही नव्या गुरुंना जमेना, मग त्यांनी ध्येय अजुन खाली आणले. मानसिक शांती, रिलॅक्सनेस, चिन्तामुक्ती , आरोग्य ही नवीन ध्येये बनली
५. शिष्याला १००% अनुभव देऊन जन्म-मरण चक्रातुन सोडवणे ही भारतीय अध्यात्माची परंपरा. नव्या गुरुंनी अनुभवाची जबाबदारी शिष्यांच्या वरच ढकलायला सुरुवात केली. सर्व प्राचीन व ऐतिहासिक गुरुंनी शिष्याची संपूर्ण जबाबदारी स्वता:वर घेतल्याचे त्यांच्या चरित्रातुन दिसते. नवे सामर्थ्यहीन गुरु नेमके उलटे करु लागले, कारण त्यांना स्वतःलाच आपल्या आध्यात्मिक उन्नती बाबत खात्री नव्हती.
६.१९४० च्या सुमारास अशांचा उदय झाला की ज्यांनी तत्वज्ञानाच्या नावाखाली मूर्तिभंजन सुरु केले. सर्व अनुभवांना विरोध करुन, शब्दच्छ्ल सुरु केला. स्थितीहीन स्थिती, कालातीत जगणे, वर्तमानात जगणे, हे सोपे असल्याचे लोकांना भासवुन उच्च बौध्दिक वर्तुळात महान तत्वज्ञ म्हणून मिरवायला सुरु केले. अनाकलनीयता व पाखंडीपणा ह्यामुळे विदेशात लोकप्रिय होण्यास ह्यांना फार वेळ लागला नाही.
७.१९८० च्या दशकात काही असे नवे संत जन्मले, जे वेदान्ताच्या नावाखाली बेधडक सांगु लागले, पुनर्जन्म वगैरे काही अस्तित्वात नाही, जे काही आहे आता इथेच . मृत्युनंतर आपण सगळेच सत्यामध्ये परत जाऊ व जन्मापूर्वी ही आपण सत्यच होतो. काही तर तुम्ही ह्या क्षणाला मुक्तच आहात, साधनेची वगैरे कोणती ही गरज नाही इ. बेलगाम असत्य प्रतिपादन करु लागले . असले पाप कृत्य करताना व बरोबर संतत्व मिरवताना त्यांना काही वाटले नाही.
८.ह्या सर्व नव्या गुरुंमध्ये एक समानता होती, अलौकिकतेला , चमत्कारांना ह्यांचा विरोध होता. कारण ह्यांच्या स्वतःजवळ ते सामर्थ्य नव्हते. सर्व सामान्य लोकांची दु:खे दुर केल्याच्या कोणत्या ही घटना ह्यांच्या चरित्रात दिसत नाहीत. सिध्दीहीन, सामर्थ्यहीन असे हे बोलबच्चन गुरु भारतीय महान योग्यांच्या परंपरेला कलंक बनुन राहिले. योगसामर्थ्य नसणे हे ह्या सर्वांचे कॉमन लक्षण होते.
१८९३ मध्ये सुरु झालेली ही परंपरा आजता गायत टिकुन आहे. अगदी १०००० कोटींची मालमत्ता ही बनवुन आहे. सर्वदुर देशात ह्यांचे आश्रम आहेत. फिलॉसोफर म्हणून ह्यातील काही जगप्रसिध्द आहेत, ह्यांचे ग्रंथ जगभर वाचले जातात. जे वाचुन अनेक लोक तात्पुरती मनःशांति मिळवतात. पण ते यु कॅन विन सारख्या उत्तेजक पुस्तकांसारखे असते. शिष्याला भवसागराच्या पार नेण्याचे अद्वितीय सामर्थ्य त्यांच्या जवळ नसते. भारतीय योग व अध्यात्म परंपरेला सगळ्यात ठेच कुणी पोचवली असेल तर ह्यांनी स्वतःच ! गेल्या साधारण शंभर वर्षात उत्पन्न झालेल्या ह्या मॉडर्न गुरुंनी !!!!!!!!!!!!!!!!!
प्रामाणिक आध्यात्मिक वाचन करणार्यांना वरील निष्कर्षात तथ्य वाटेल अशीआशा आहे....................
ता.क.- नावे मुद्दामुनच घेतलेली नाहीत, कारण लिस्ट मोठी होईल, व त्यातुन मुद्दा हरवेल.
सप्रेम नमस्कार. मनुष्य एका अध्यात्मिक संमोहित निद्रेत जगत आहे. ज्याला आपण तथाकथित जागृती म्हणतो, ती एक विशिष्ठ प्रकारची निद्रा आहे.त्याला त्याच्या निद्रेतून जागे करण्याचे कार्य गुरु करतो.आजच्या काळातील तथाकथित गुरु त्यांच्या शिष्यांना जागे न करता ,ते स्वतःची चैनि करण्यात रमले आहेत.काही गुरु अतिशय खालच्या पातळीचे वर्तन करत आहेत.तथाकथित गुरु नालायक आहेत.
ReplyDeleteयाचा अर्थ आजच्या काळात खरे गुरु नाहीत असा होत नाही. खरे गुरु प्रसिद्धीपासून लांब आहेत.योग्य शिष्याला योग्य गुरु मिळतोच.त्यामुळे सर्व गुरूंना एकाच रांगेत बसवणे चुकीचे आहे.तुमची सर्व मते आम्हाला पटलेली नाहीत.
१. मागील ६०० वर्षात भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यामुळे भारताचे आर्थिक ,धर्मिक ,सांस्कृतिक नुकसान झाले. याचा परिणाम म्हणून भारताची सुबत्ता नष्ट झाली.भारतीय समाजाच्या मुलभूत गरजा भागेनाषा झाल्या.भारतीय समाज पोट भरणे,कुटुंब पालन,आजारपण यामध्येच गुरफटून राहिला.त्यामुळे त्याचा आत्मा -परमात्मा ,ध्यान -धारणा,इ. संबंधी ओढ कमी झाली.तो विकल्प शोधू लागला. जे काही लोक अध्यात्मात रस घेत होते,त्यांनी तथाकथित गुरु गाठले. महावीर,श्रीकृष्ण,श्रीराम,गौतम बुद्धा हे सर्व राजपुत्र होते.वेदकाळात,उपनिषद काळात भारत अतिशय श्रीमंत होता.त्यांच्या मुलभूत गरजा काहीही न करता भागत होत्या.म्हणून तो समाज सर्व भोग भोगून तृप्त झाला होता.जेंव्हा सर्व सुखे भोगून त्या सुखांच्या क्षण-भंगुरतेचा अनुभव त्यांना आला तेव्हा ते अक्षयतेच्या शोधास लागले.
पाश्चिमात्य समाज अशा उन्नत अवस्थेला पोहोचला आहे.त्यांना अद्यात्मात रस वाटू लागला.त्यांना गुरूंची गरज भासली.त्यांना काही भारतीय गुरूंनी मदत केली.काही गुरु परदेशात गेले कारण भारतात त्यांना समजणार्यांची संख्या खूप कमी होती.गुरुसाठी मनुष्य महत्वाचा आहे.
2.जीजस,बुध्द,महावीर,मोहम्मद या सर्वांनी मोर्ती पूजेला विरोध केला.पण सर्व जन निर्गुण-निराकार चैत्यन्याची धारणा करू शकत नाहीत.जे अशी धारणा करू शकतात त्यांच्यासाठी ते शक्य आहे.प्रत्येक जीवाच्या आत्मिक अवस्थेवर त्याच्यासाठीची साधना आणि मार्ग बदलतात. हावीर,मोहम्मद या सर्वांनी मोर्ती पूजेला विरोध केला.पण सर्व जन निर्गुण-निराकार चैत्यन्याची धारणा करू शकत नाहीत.जे अशी धारणा करू शकतात त्यांच्यासाठी ते शक्य आहे.प्रत्येक जीवाच्या आत्मिक अवस्थेवर त्याच्यासाठीची साधना आणि मार्ग बदलतात.
३.पतंजली योग-सूत्रात अतींद्रिय सिद्धींचा उल्लेख आहे.साधना मार्गात या सिद्धी प्राप्त होतात.या सिद्धी मानसिक शक्तींवर आधारित आहेत.पण मनाचा लोप हि ध्यानाची फलश्रुती असल्याने ,या सिद्धींचा वापर साधकाच्या प्रगतीत बाधा उत्पन्न करू शकतो.हवेतून राख,अंगठी,इ.काढून एखाद्याला स्वतःच्या मागे लावण्यापेक्षा काही गुरुनी त्याच्या शिष्याच्या झोपेवर आघात केला.जीवन एक महान चमत्कार असताना त्यापेक्षा मोठा चमत्कार काय असू शकतो?काही गुरुनी वेळप्रसंगी काही चमत्कार दाखवले.ती त्या प्रसंगाची गरज होती म्हणून.
ReplyDelete४.अष्टावक्र महागीतेत मनुष्य नित्य मुक्त आहे ,असे प्रतिपादन केलेले आहे. सर्व करून भागल्यावर,नदीच्या त्या किनार्यावर पोहोचल्यावर नाव सोडावीच लागते. जर नाव सोडायचीच आहे तर नावेत बसायाचेच कशाला? असा प्रश्न अलीकडच्याने केल्यासारखे होईल.त्या पलीकडे पोहोचलेल्यासाठी तो उपदेश आहे.प्रत्येक मनुष्यासाठी मार्ग वेगळे-वेगळे आहेत.
ReplyDelete५.समाधी अष्टांग योगाची आठवी पायरी आहे.ध्यान हि सहावी पायरी आहे.ज्याने ध्यान केलेले नाही त्याने समाधीची अपेक्षा ठेऊ नये.आज ध्यान कितीजण करतात?किती लोक यम-नियमांचे पालन करतात? दैनंदिन वृत्तपत्र वाचल्यास माणूस हा खरेच माणूस आहे का असा प्रश्न पडतो.प्राण्यांपेक्षा खालच्या पातळीवर उतरून मनुष्य वागतो आहे.अशा माणसांची संख्या समाजात ७०% आहे.अशा लोकांसाठी आधी माणूस होणे गरजेचे आहे.समाधी खूप लांबची गोष्ट आहे.अशा ७०% लोकांसाठी त्यांच्या कलेने घेऊन जाणारा गुरु आवश्यक आहे.
ReplyDeleteसामाजिक बंधने झिडकारून, प्रचलित धारणा झुगारून, सामाजिक संकेत धाब्यावर बसवून शून्यात भ्रमल्याने, मनमानी वागल्याने मुक्ती मिळते अशी पाचकळ अंधश्रद्धा पसरवत आयुष्यभर फुकटचे खाऊन ऐशोआराम करतात ते हल्लीचे सद्गुरू. आपल्या सगळ्या विकृती, विकार यांची मात्र 'नैसर्गिक प्रेरणा' या लेबलखाली भलामण करायची. यांच्या शाब्दिक फटकेबाजीला भलेभले भुलतात आणि स्वत:चीच फसवणूक करून घेतात. विवेक,वैराग्याचे अधिष्ठानच नाही, भक्तीचा लवलेश नाही आणि गमजा मात्र सविकल्प, निरीकल्प पलीकडच्या सहज समाधीच्या! या लेखातले विचार पटले.
ReplyDelete100% correct. Such fake Gurus have also caused a Gangotri of fake shishyas, who themselves don't know what they want. That has had a circular effect of increasing fake Gurus and fake shishyas. The only benefit these Gurus have caused as a side-effect is that through one of them, somehow a pUrvasamskAra of a true sAdhakA shines... such a kaschit dheeraH searches for the right Guru within the sampradAyA and benefits.
ReplyDeletehari om.
ya... that is only possible use.. as going through different Gurus, once ever True sadhaka gets Right one.........(if only his Purva Sanskara permi) Otherwise he is on unending journey of self - delusion.
ReplyDelete